डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. Operation Mahadev : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाषण करत आहेत. शाह म्हणाले की, भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवमध्ये (Operation Mahadev) ठार मारले आहे.
ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चा आज लोकसभेत सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७ वाजता समारोपाचे भाषण देतील.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत माहिती दिली आहे की, पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले आहेत. ऑपरेशन महादेव दरम्यान भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.
LIVE: HM Shri @AmitShah on #OperationSindoor during a special discussion in Lok Sabha. https://t.co/2f4d8ayB1E
— BJP (@BJP4India) July 29, 2025
अमित शहा म्हणाले की कालच्या कारवाईत सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले आहे. अमित शहा म्हणाले की या दहशतवाद्यांना अन्न पुरवणारे लोक आधीच ताब्यात होते. या दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणल्यानंतर, ताब्यात असलेल्या लोकांनी हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याची पुष्टी केली आहे.