जेएनएन, मुंबई NRI Day: दरवर्षी 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीयांनी केलेल्या योगदानाची नोंद घेण्यासाठी साजरा केला जातो. 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे, 1915 या दिवशी मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते.  भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे त्यांनी नेतृत्व केले होते आणि भारतीयांना इंग्रजांच्या जाचातून सुटका मिळवून दिली होती. 2003 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त परिषदा आयोजित केल्या जातात. या परिषदेमार्फत परदेशी भारतीय समुदायाला त्यांच्या मातृभूमीतील भूमीतील लोकांशी कनेक्ट करून देते. या दरम्यान भारताच्या विकासात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या  भूमिकेचे कौतुक करण्यासाठी त्या व्यक्तींना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ देखील प्रदान करतो.

प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची सुरवात भारत सरकारने एल. एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समिती शिफारशींनुसार हा निर्णय घेतला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 8 जानेवारी 2002 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात समितीचा अहवाल नुसार 9 जानेवारी 2002 हा दिवस "प्रवासी भारतीय दिवस" ​​(PBD) म्हणून घोषित केला. 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतल्याच्या निमित्ताने हा दिवस निवडला गेला.

प्रवासी भारतीय परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश

  • अनिवासी भारतीयांना त्यांच्या देशाविषयीचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी तसेच देशवासियांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
  • स्थलांतरितांच्या कामगिरीबद्दल भारतीयांना माहिती देणे आणि त्यांच्याकडून देशातील नागरिकांना कोणत्या अपेक्षा आहे त्याची जाणीव त्यांना करून देणे.
  • जगभरातील 110 देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे.
  • इतर देशांची भारताची असलेली भारताच्या सौहार्दपूर्ण संबंधांमागे स्थलांतरितांची कोणती भूमिका आहे याबाबदल माहिती देणे.
  • देशातील तरुणांना स्थलांतरितांशी जोडणे.
  • भारतीय कामगारांना परदेशात कराव्या लागणाऱ्या अडचणींवर चर्चा करणे.

प्रवासी भारतीय दिवस 2024 साठी थीम

एखादे संमेलन किंवा परिषदेचे आयोजन केले जाते तेव्हा, त्या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी एक विषय ठरवला जातो. त्या विषयाशी अनुसरून मुद्दे, चर्चासत्रे तसेच त्याच्याशी संबंधित अडचणींवर चर्चा केली जाते. प्रवासी भारतीय दिवस  २००३ पासून साजरा केला जातो आणि या निमित्ताने प्रवासी भारतीय परिषदेचे आयोजन केले जाते. वर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या प्रवासी भारतीय संमेलनासाठी 'आत्मनिर्भर भारतासाठी योगदान' ही थीम ठेवण्यात आली आहे.