डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. USA India Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'सेमीकॉन इंडिया' परिषदेत बोलताना सांगितले की, "जगाचा भारतावर विश्वास आहे आणि तो भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यासाठी तयार आहे."
त्यांनी संकेत दिले की, भारत जागतिक सेमीकंडक्टर इकोसिस्टीममध्ये अग्रणी भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार या क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी लवकरच "पुढील पिढीतील सुधारणा" सुरू करेल.
पंतप्रधान म्हणाले, "भारतात बनलेली सर्वात लहान चिपही जगात सर्वात मोठे बदल घडवेल."
ट्रम्प यांच्यावर पंतप्रधान मोदींचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, "आर्थिक स्वार्थातून निर्माण झालेल्या आव्हानां"नंतरही, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.8 टक्क्यांनी वाढला आहे. त्यांचा रोख अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर लावलेल्या टॅरिफकडे होता.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेने "प्रत्येक अपेक्षा आणि अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली आहे". ते म्हणाले, "भारताने अशा वेळी 7.8 टक्क्यांची वाढ मिळवली आहे, जेव्हा जगभरात आर्थिक चिंता आहेत आणि आर्थिक स्वार्थातून निर्माण झालेली आव्हाने आहेत."