जेएनएन, नवी दिल्ली. भारतीय सैन्याचं केलं अभिवादन, ऑपरेशन सिंदुरच का, पहलगामचा हल्ला झाला म्हणूनच ऑपरेशन सिंदुर का! पहलगाम या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का नव्हते. सिंदुर नाव देऊन लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. आतंकवाद्यांना अद्याप का पकडले नाही. तुम्हाला यांची माहिती द्यायला हवी, असं उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. संसदेत सध्या पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session 2025) सुरु आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा (Operation Sindoor Special discussion) होत आहेत. 

यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, आम्ही सरकारच्या सोबत आहोत, आम्ही भारतीय जवानांच्या सोबत आहोत. ऑपरेशन सिंदुर झाले यानंतर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्कारली, असं मंत्र्यांनी सभागृहात सांगतिले. मग भारताने बिनशर्त सिजफायर का थांबवले, असा सनसनीत सवाल अरविंद सावंत यांनी सरकारला केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इतर राष्ट्रांशी इतके चांगले संबंध आहेत. त्यांना इतर देशातील नेते मोठ्या प्रमाणात मानतात, मग या युद्धाच्या परिस्थितीत आणि परिस्थितीनंतर इतर देश आणि शेजारील राष्ट्र आपल्यासोबत का उभे राहिले नाही, असाही सवाल त्यांनी अध्यक्षांना केला.

…तर पंतप्रधानांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युद्ध काळात पेसै दिले. आम्ही सरकार सोबत आहोत. सरकार म्हणतं होतं त्यांना पैसे देऊ नका मात्र, यावेळीही पंतप्रधानांचे कोणी ऐकलं नाही, असं सावंत सभागृहात म्हणाले. भाजपाने पहिल्यापासून पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याची भूमिका घेतली आहे, नेहमी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर मिळवू असं म्हणतं राहता, मग जर पाकिस्तानने भारतीय सैनासमोर गुडघे टेकले होते, असं तुम्ही पाक व्याप्त काश्मीर परत का मिळवला नाही, असा प्रश्न यावेळी त्यांनी केला. जर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवळा असता तर पंतप्रधानांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो, असं अरविंद सावंत म्हणाले.

खासदार अमर काळेंचा सरकारला सवाल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वेळा अमेरिकेला भेट दिली आहे. तरीही ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख्यांना जेवनासाठी बोलवतात. ही भारतीय म्हणून आपल्यासाठी वाईट गोष्ट आहेत, मंत्र्यांनी आपली परराष्ट्र निती कुठे कमी पडली याची माहिती सभागृहाला द्यावी, असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केलं.