डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. भारतीय जनता पक्षाने (BJP) पक्षात मोठा संघटनात्मक बदल करत देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन प्रदेश प्रभारी आणि सह-प्रभारींच्या नियुक्त्या केल्या आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवीन यांच्याकडून करण्यात आलेल्या या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, राष्ट्रीय अध्यक्षांनी वरिष्ठ नेते आणि अनुभवी संघटकांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवली आहे. 

बैजयंत जय पांडा, अमित मालवीय महाराष्ट्राचे  प्रभारी

भाजपाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून बैजयंत जय पांडा, अमित मालवीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून सदानंद शेट तनावाडे आणि श्रीमती कमलजीत सहरावत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे सह-प्रभारी म्हणून जगदीशी पटेल, मेधा कुलकर्णी, डॉ. प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच आता बिहारबद्दल बोलायचे झाल्यास हरीश द्विवेदी यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सह-प्रभारी म्हणून संगीता यादव आणि रोहन गुप्ता यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

    येथे पहा संपूर्ण लिस्ट

    क्र.सं.राज्य / केंद्र शासित प्रदेशप्रभारीसह-प्रभारी
    1अंदमान & निकोबारजय प्रकाश (दिल्ली)-
    2अरुणाचल प्रदेशडॉ. देवेश कुमार (बिहार)-
    3आंध्र प्रदेशवनथी श्रीनिवासनडॉ. अरविंद भदौरिया
    4आसाममंगल पांडेफांग्नोन कोन्याक
    5बिहारमनोज टिग्गाहरीश द्विवेदी, श्रीमती संगीता यादव
    6चंडीगडरोहन गुप्ता-
    7छत्तीसगडमहेंद्र पांडेस्मृति ईरानी, श्री सिद्धार्थ शम्भू
    8दादरा नगर हवेली & दमन आणि दीववर्षाबेन नरेंद्रभाई दोशी-
    9दिल्लीडॉ. विनय सहस्रबुद्धेजामयांग त्सेरिंग नामग्याल, श्रीमती दर्शनाबेन जरदोश
    10गोवाडॉ. भारती प्रवीण पवारअनिल एंटनी
    11गुजराततरुण चुघअजय महावर, श्रीमती गोमती साई
    12हरियाणास्मृती ईरानीडॉ. भोला सिंह
    13हिमाचल प्रदेशश्रीकांत शर्मादर्शाना सिंह
    14जम्मू & कश्मीरडॉ. सतीश पूनियारीना कश्यप (हिमाचल प्रदेश), श्री गजेंद्र पटेल
    15झारखंडसौरभ सिंहनिवेदिता सिंह (बिहार)
    16कर्नाटकहरीश द्विवेदीडॉ. कसम वेंकटेश्वरलू
    17केरलमप्रो. एम. नागराजाएम. वेंकटेशन
    18लद्दाखराजकुमार भाटिया (दिल्ली)-
    19लक्षद्वीपजॉर्ज कुरियन-
    20मध्य प्रदेशबिप्लब कुमार देबरेखा वर्मा
    21महाराष्ट्रबैजयंत जय पांडा, श्री अमित मालवीयसदानंद शेट तनावाडे, श्रीमती कमलजीत सहरावत
    22मणिपूरडॉ. राजदीप रॉय-
    23मेघालयकनाद पुरकायस्थडॉ. नुमल मोमिन (असम)
    24मिजोरमडॉ. भगवत कराड-
    25नगालैंडअनिल एंटनी-
    26ओडिशाडी. पुरंदेश्वरीडॉ. स्वदेश सिंह
    27पुदुचेरीके. सुरेंद्रन-
    28पंजाबडॉ. सतीश पूनियावीरेंद्र सचदेवा, श्रीमती (डॉ.) अलका गुर्जर
    29राजस्थानसंजय भाटियाकविता पाटीदार, श्री कुलजीत चहल
    30सिक्किमराजू बिस्ता-
    31तमिलनाडूराम माधवनिर्मल कुमार सुराणा, श्रीमती डी. के. अरुणा
    32तेलंगानासुनील बंसलअभय पाटिल, श्रीमती रेखा शर्मा
    33त्रिपुरामृगांका देव बर्मन-
    34उत्तर प्रदेशविनोद तावडे, जगदीश पटेलमेधा कुलकर्णी, डॉ. प्रदीप वर्मा, अनंत ओझा
    35उत्तराखंडराम माधव, अरविंद मेननबांसुरी स्वराज
    36पश्चिम बंगालसुनील बंसललाल सिंह आर्य, राजेंद्र सिंह (बिहार), पिंकी कुशवाहा (बिहार)