जालंधर. LPU Student Protest: लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) च्या विद्यार्थिनीवर बलात्काराच्या दाव्यानंतर विद्यार्थ्यांचे निदर्शन इतके उग्र झाले की पोलिसांना त्याला रोखण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. 20 तासांपर्यंत जालंधर-फगवाडा हायवेवर जाम लावला ज्यामुळे रहदारी पूर्णपणे ठप्प झाली.

ताज्या रिपोर्टनुसार, आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आपापल्या घराकडे परतू लागले आहेत. खरं तर, वाढते उग्र निदर्शन पाहता युनिव्हर्सिटीने 10 दिवसांसाठी रेग्युलर क्लासेस सस्पेंड केले आहेत. अशात विद्यार्थी आपल्या घराकडे परतत आहेत.

पालक मुलांना नेण्यासाठी पोहोचले -

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून मुलांचे पालक त्यांना नेण्यासाठी युनिव्हर्सिटीत पोहोचले. विद्यापीठाबाहेर मोठ्या संख्येने मुले आपले सामान घेऊन नातेवाईकांसोबत घराची वाट धरताना दिसली.

विद्यापीठाने सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलल्या-

विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना विद्यापीठात पसरताच विद्यार्थी-विद्यार्थिनी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अनेक वास्तूंची तोडफोड केली. काही वाहनेही जाळली. विद्यापीठाच्या सुशोभिकरण केलेल्या भागाचेही या हिंसेत नुकसान झाले आहे.  एका प्लंबरने विद्यापीठातील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले. वसतिगृह अधीक्षकांना याबद्दलची माहिती दिली गेली, पण त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप विद्यार्ध्यांकडून होत आहे. त्यानंतर हिंसाचार उसळला.

    पकडलेल्या अज्ञात लोकांकडून मिळाले वॉकी-टॉकी -

    लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) मध्ये विद्यार्थ्यांच्या निदर्शनावर २७ व्या बटालियनच्या कमांडंट गुरमीत कौर यांनी सांगितले, आम्ही पाच तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोयता आणि एक वॉकी-टॉकी जप्त करण्यात आली आहे. आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    आता त्या सर्व लोकांची चौकशी होईल. आतापर्यंत या गोष्टीचा पत्ता लागलेला नाही की ते सर्व लोक कुठून आहेत आणि तिथे काय करण्यासाठी आले होते.

    LPU प्रकरणात CM मान अॅक्शन मोडवर -

    एलपीयू मध्ये विद्यार्थिनीवर दुष्कर्माच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांचे निदर्शन आणि नॅशनल हायवे जाम केल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दोषींना सोडले जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई होईल.

    तसेच सीएम मान यांनी DGP गौरव यादव यांना ग्राउंडवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत.

    परिस्थिती आता नियंत्रणात -

    पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे की आता परिस्थिती नियंत्रणात आहे. एलपीयू युनिव्हर्सिटीला चारी बाजूंनी घेरले गेले आहे आणि सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही अपील केले आहे की त्यांनी पॅनिक होऊ नये कारण आता स्थिती अंडर कंट्रोल आहे.

    प्रशासनाने सांगितले ही फक्त अफवा - 

    दुसरीकडे युनिव्हर्सिटी प्रशासनाने सांगितले आहे की ज्या काही गोष्टी इंटरनेटवर व्हायरल होत आहेत त्या सर्व फेक आहेत. युनिव्हर्सिटीला बदनाम करण्यासाठी अफवा पसरवली जात आहे.

    प्रशासनाने विद्यार्थ्यांनाही सांगितले आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अशांतीवाल्या संघटनेत सामील होऊ नये. आपल्या हॉस्टेलमध्ये राहावे, खोलीत राहावे आणि सुरक्षित राहावे.