जेएनएन, नवी दिल्ली. Jangpura Assembly Election 2025 Results: जंगपुरा हा दक्षिण दिल्लीतील एक भाग असून, दिल्लीच्या 70 विधानसभा जागांमध्ये जंगपुरा सीटचाही समावेश आहे. जंगपुरा 1972 मध्ये विधानसभा मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आला. तत्कालीन निवडणुकीत काँग्रेसचे जगप्रवेश चंद्र येथून आमदार झाले होते. 1983 ते 2008 पर्यंत काँग्रेसने सलग 5 वेळा विधानसभा आणि एकूण 6 वेळा लोकसभा जागा जिंकली. 2013 मध्ये आपचे महेंद्रसिंग धीर जंगपुरामधून विजयी झाले होते. सध्या आम आदमी पक्षाचे प्रवीण कुमार येथून आमदार आहेत. प्रवीण सलग दुसऱ्यांदा या जागेवरून निवडूण आले होते. आता या जागांवर भाजपानं वर्चस्व मिळवलं आहे.

ब्रिटिश काळात रायसीना परिसरात राहणाऱ्या लोकांना राजपथ बांधण्याचे काम एका कर्नल यंगने सुरू केले होते. यानंतर स्थापन झालेल्या वसाहतीचे नाव यंगपुरा ठेवण्यात आले. जो नंतर जंगपुरा मध्ये बदलला. मोठ्या संख्येने शॉपिंग मॉल्स, शॉपिंग स्टोअर्स, विविध कंपन्यांचे शोरूम याशिवाय या परिसरात दररोज मोठी बाजारपेठ भरते.

दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी पार पडल्या ज्याचा निकाल आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभा मतदार संघ असून, 41 जंगपूरा हा मतदार संघ देखील आहे. या मतदार संघाची लोकसंख्या 1,46,383 इतकी असून, या मतदार संघातून 1993 मध्ये काँग्रेसचे जग प्रवेश चंद्र, 1998 ते 2008 पर्यंत काँग्रेसचेच तरविंदर सिंग मारवाह तर 2013 मध्ये आपचे मनिंदर सिंग धिर आणि 2015 मध्ये आपचे प्रवीण कुमार हे निवडणून होते.

जंगपुरा मतदार संघातून सरदार तरविंदर सिंग मारवाह विजयी

2025 च्या निवडणुकांसाठी जंगपुरा मतदार संघातून आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया तसेच भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह तर काँग्रेसच्या वतीने फरहाद सूरी हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये सरदार तरविंदर सिंग मारवाह यांनी विजय मिळवला आहे. त्यांना मतमोजणीच्या एकूण 10 फेरीमध्ये 38859 मते मिळाली आहेत. त्यांनी सिसोदिया यांना 675 मतांनी पराभूत केलं आहे. काँग्रेसच्या फरहाद सूरी यांना अवघे 7350 मते मिळाली आहेत.

    पक्षआम आदमी पक्षभाजपकाँग्रेस
    उमेदवारमनीष सिसोदियासरदार तरविंदर सिंग मारवाहफरहाद सूरी
    निकाल38184 ( -675)38859 (+ 675)7350 (-31509)