जयपूर- शहरातील करधनी परिसरात आपल्या घरात पत्नी आणि तीन मुलींची निघृण हत्या केल्यानंतर फरार झालेल्या 45 वर्षीय आरोपीला रविवारी सीकर जिल्ह्यातील रींगस परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

डीसीपी (पश्चिम) प्रशांत किरण यांनी सांगितले की, राहुल झा याला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी शुक्रवारी सकाळी चार जणींची हत्या केल्यानंतर जयपूरमधून पळून गेला होता. 

जयपूरहून गेला खाटू श्याम दर्शनाला -

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पत्नी व तीन मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी देवाच्या दर्शनाला जयपूरहून खाटू श्याम गेला होता. त्यानंतर तो जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र दौनंदिन खर्चासाठी त्याच्या जवळचे पैसे संपले होते. 

पोलिसांनी सांगितले की, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आपली सोन्याची अंगठी विकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर राहुल तेथून निघाला व रींगसला गेला. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांना समजले की, त्याला रींगसमधील हॉटेलच्या आसपास फिरताना पाहिले गेले होते.  त्यानंतर पोलिसांची टीम रविवारी हॉटेलच्या बाहेर तैनात करण्यात आली. 

जसे राहुल झा रुमालाने आपला चेहरा लपवत हॉटेलमधून बाहेर पडू लागला तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याला पकडले. पोलीस साध्या वेशात असल्याने त्याला संशय आला नाही. घटनास्थळीच त्याची ओळख पटवण्यात आली व त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन जयपूरला आले.

    राहुलने आपला गुन्हा केला कबूल -

    झा आपली पत्नी गीता (40) आणि मुली नंदनी (23), राधिका (17) आणि गौरी (14) यांच्या हत्येप्रकरणी वाँडेट होता. पोलिसांनी सांगितले की, त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला आहे. त्यानंतर सांगितले की, कौटुंबिक वाद व पत्नी व मोठ्या मुलीशी असलेल्या भांडणातून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. 

    पोलिसांनी कुटूंबीच्या गोविंद वाटिका येथील घरीतून झा याचे रक्ताने माखलेले कपडे व मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. त्याने पळून जाण्याआधी आपला फोन बंद केला होता.