डिजिटल डेस्क, बेंगळूरु- कर्नाटक हायकोर्टाने एक महत्वपूर्ण निकाल देत म्हटले आहे की, कोणताही पुरुष कोणत्याही महिलेला ज्यामध्ये त्याची पत्नीही आली, घरकामासाठी किंवा आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी आदेश देऊ शकत नाही.

हायकोर्टाने म्हणणे आहे की, घरकामामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये समान भागीदारी असली पाहिजे. जर आई-वडिलांची काळजी घेणे गरजेचे असेल तर ही मुलगा किंवा मुलीची जबाबदारी असते सून किंवा जावयाची नाही.

'सासू-सासऱ्याची सेवा करण्यासाठी दबाव आणू शकत नाही -

जस्टिस चिल्लाकुर सुमलता यांनी 3 ऑगस्ट रोजी नेलमंगला तालुक्यातील एका रहिवाशाची याचिका फेटाळून लावताना आपल्या आदेशात म्हटले की, जावई किंवा सूनेद्वारे सासरच्या लोकांची काळजी घेणे त्यांच्या मर्जीनुसार असले पाहिजे, त्यांच्यावर जबरदस्ती करता येणार नाही.

याचिकाकर्त्याने हायकोर्टात तुमकुरुमधील एका फॅमिली कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. फॅमिली कोर्टाने तरुणाला त्याच्या पत्नीला निर्वाह-भत्ता (मेंटेनेंस) च्या रुपात 5,000 रुपये आणि आपली अल्पवयीन मुलीला 4,000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. 

याचिकाकर्त्याने दावा केला की, तो एक मजूर (हमाल) आहे आणि ही रक्कम खूपच मोठी आहे. त्याला आपल्या वृद्ध आई-वडिलांचाही सांभाळ करावा लागतो.  त्याने पुढे म्हटले की, लग्नाच्या सहा महिन्यातच त्याच्या पत्नीचा आपल्या सासू-सासऱ्याप्रति दृष्टीकोण बदलला आणि तिने घरकाम करणे व त्यांची सेवा करण्यास नकार दिला.

    याचिकाकर्त्याने आपल्या पत्नीवर आरोप केला की, ती त्याची व सासू-सासऱ्याची परवानगी न घेताच आपल्या माहेरी जात असे. 

    हायकोर्टाने फटकारले -

    जस्टिस चिल्लाकुर सुमलता यांनी म्हटले की, याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेतल्यास कोणालाही समजेल की, त्याने पत्नीला घरातील कामासाठी आणि आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी एक मोलकरीण म्हणून घरात ठेवले आहे. 

    याचिकाकर्त्याचे म्हणणे की, त्याच्या परवानगीशिवाय ती माहेरी गेली होती, त्याचे विचार समोर आणते. पत्नीवर नियंत्रण ठेवणे व तिला आदेश देण्याची त्याची इच्छा दर्शवते. 

    न्यायाधीशांनी म्हटले की, कोर्टाला हे समजत नाही की, कोणत्याही भारतीय महिलेला जेव्हा इच्छा होईल किंवा गरज भासेल आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी सासरच्या लोकांची परवानगी घेणे गरजेचे का आहे.

    'लग्न म्हजे कंट्रोल करण्याचे लायसेन्स नाही-'

    हायकोर्टाने म्हटले की, विवाह एक पवित्र बंधन आहे जो दोन लोकांना एकत्र आणतो. लग्नतील विधी त्यांना पती-पत्नी बनवतो मात्र प्रेम, विश्वास आणि सन्मान, एक-दूसऱ्याची साथ त्यांना जीवन साथी आणि पार्टनर बनवतात. एक महिलेला आपल्या करिअर, पैसे व आयुष्यात महत्वाचे निर्णय घेण्याची स्वतंत्रता आहे. एक पती आपल्या पत्नीला आपल्या इच्छेनुसार जगण्यास जबरदस्ती करू शकत नाही.

    विवाह एखाद्या व्यक्तीची ओळख, स्वतंत्रता आणि इच्छेला कंट्रोल करणे तिला कमजोर करण्याची लायसेन्स नाही.