जेएनएन, दिल्ली. Ganeshotsav 2025: महाराष्ट्र मंडळ, मयूर विहार यांनी आयोजित केलेला चार दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव 2025 अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. 27 सप्टेंबर रोजी आचार्य निकेतन मार्केटमधील गर्ग सेलिब्रेशन हॉल येथे बाप्पाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं, संगीत संध्या, मेळावे आणि महाप्रसादाचा भक्तांनी मनमुराद आनंद घेतला.

पहिल्या दिवशी मुलांनी गाणी, नृत्य, संस्कृत श्लोकांचे पठण यासह विविध गुण दर्शन या कार्यक्रमात आपला कला कौशल्याचा जलवा दाखवला. ज्येष्ठ नागरिक डॉ. सुलभा कोराने यांनी नाट्यसादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी अनामिका गौतम दिग्दर्शित रामायणाच्या महिला या नाटकाने प्रेक्षकांना विचारप्रवृत्त केले.

तिसऱ्या दिवशी स्वरधारा या भजन आणि गाण्यांच्या कार्यक्रमाने वातावरण सुरेल केले, तर चौथ्या दिवशी सत्यनारायण पूजेनंतर झालेल्या अंताक्षरी स्पर्धेत भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसाद देण्यात आला. यावर्षी विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले. बाप्पाची मूर्ती स्टीलच्या टबमध्ये विरघळवून त्याची माती परिसरातील झाडांमध्ये मिसळण्यात आली. या यशस्वी आयोजनासाठी प्रायोजक, स्वयंसेवक, समन्वयक आणि भाविकांचे मंडळाने मनःपूर्वक आभार मानले. महाराष्ट्र मंडळ, मयूर विहारचा गणेशोत्सव 2025 हा भक्ती, कला आणि पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम ठरला.

मंडळ त्यांचे प्रायोजक मराठी जागरण, बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमान्य, डी क्ले एम्पोरियम आणि कृष्णा सन्स ज्वेलर्स यांचे आभार मानते. मंडळ गर्ग सेलिब्रेशन्सचे मालक योगेश गर्ग यांचे विशेष आभार मानू इच्छिते, त्यांनी केलेल्या प्रचंड मदतीबद्दल आणि प्रत्येक दिवशी स्वादिष्ट जेवण वेळेवर मिळावे यासाठी आणि कार्यक्रमांसाठी काही भेटवस्तू प्रायोजित केल्याबद्दल. चार दिवसांचा गणेश उत्सव भाविकांच्या चांगल्या सहभागाने खूप यशस्वी झाला. गणेशोत्सव २०२५ ला भव्य यशस्वी बनवल्याबद्दल मंडळ सर्व सहभागी, समन्वयक, प्रायोजक, पुजारी पंडित कृष्णकांत मिश्रा आणि भक्तांचे आभार मानू इच्छिते.