नवी दिल्ली: SIR announcement : निवडणूक आयोगाने देशव्यापी मतदार यादी पुनरीक्षण (SIR) जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ज्या राज्यांमध्ये नजीकच्या भविष्यात निवडणुका होणार आहेत तेथे SIR सुरू होईल.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, बिहारमधील एसआयआरच्या तयारीच्या आधारे, निवडक राज्यांमध्ये एसआयआर सुरू केला जाईल. त्यांनी सांगितले की प्रत्येक मतदान केंद्रावर 1,000 मतदार असतील. एसआयआरचा दुसरा टप्पा 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू होईल. यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

SIR चे वेळापत्रक काय आहे?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, एसआयआर प्रक्रियेचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. प्रिटिंग आणि ट्रेनिंग 28 ऑक्टोबर 2025 ते 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालेल. 4 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली जाईल. 9 डिसेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी सादर केली जाईल.

बिहारमधील मतदार यादीसाठी एसआयआर प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. अंदाजे 74.2 कोटी नावे असलेली. अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली. बिहारमध्ये मतदान 6 आणि 11नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होईल आणि 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
हे ही वाचा -PM Modi: '21 वे शतक हे आपलेच', आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले; अॅक्ट ईस्ट धोरणाचाही केला उल्लेख
या कागदपत्रांची आवश्यकता असेल
- केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेला पेन्शन पेमेंट ऑर्डर
- सरकार किंवा स्थानिक संस्था, बँक, पोस्ट ऑफिस, एलआयसी यांनी दिलेले प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र
- वन हक्क प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- एनआरसी
- राज्य किंवा स्थानिक संस्थेने तयार केलेले कुटुंब नोंदणीपत्र
- जमीन किंवा घर अलॉटमेंट सर्टिफिकेट

