जेएनएन, नवी दिल्ली. All India Voter List SIR : बिहारनंतर, निवडणूक आयोगाने आता संपूर्ण देशातील मतदार यादीची फेर पडताळणी (SIR) करण्याचा विचार मांडला आहे.
मतदार याद्यांच्या एसआयआरबाबतच्या 24 जूनच्या आदेशात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "मतदार याद्यांच्या अखंडतेचे रक्षण करण्याच्या त्यांच्या संवैधानिक आदेशानुसार आयोगाने आता देशभरात विशेष सघन पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील उर्वरित भागात एसआयआरचे वेळापत्रक योग्य वेळी जारी केले जाईल.
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे काय? Special Intensive Revision
निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी वेळोवेळी त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. अपात्र व्यक्तींना काढून टाकून निवडणुकीची पवित्रता वाढते.

एसआयआरविरुद्धच्या निषेधाला उत्तर देताना आयोगाने त्याचे महत्त्व स्पष्ट केले होते. आयोगाने म्हटले होते की, भारताचे संविधान ही भारतीय लोकशाहीची जननी आहे.... तर, निवडणूक आयोगाने या गोष्टींना घाबरून काही लोकांच्या प्रभावाखाली येऊन, संविधानाविरुद्ध जाऊन मृत मतदार, कायमचे स्थलांतरित मतदार, दोन ठिकाणी मते नोंदवलेले मतदार, बनावट मतदार किंवा परदेशी मतदार, प्रथम बिहारमध्ये आणि नंतर संपूर्ण देशात बनावट मते टाकण्याचा मार्ग मोकळा करावा का?
बिहारमध्ये मतदार यादी फेर पडताळणीत 52 लाख मतदार बाद!
बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या फेर पडताळणीत 52 लाख मतदारांची नाव रद्दहोणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाने 52.30 लाख बोगस मतदारांची यादी जाहीर केली असून त्यातील बहुतांशी मतदार हे मृत किंवा कायमचे अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. त्यातील 18 लाख ६६ हजार 869 जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 लाख 1031 मतदार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. तर 7 लाख 50 हजार 742 मतदारांचे नाव एकाहून अनेक मतदार यादीत आहेत. तसेच 11,484 मतदारांचा कोणताच पत्ता नाही.
