नवी दिल्ली. ISIS च्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या मॉड्यूलशी संबंधित दोन संशयितांना अटक केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दोन संशयित दहशतवाद्यांपैकी एक दिल्लीचा रहिवासी आहे तर दुसरा मध्य प्रदेशचा आहे.

अटक करण्यात आलेल्या संशियत दहशतवाद्यांकडून संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवाद्याला भोपाळमध्ये अटक करण्यात आली, तर दुसऱ्या संशयिताला दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. दिल्लीतील गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे.