नवी दिल्ली: Cyclone Montha : 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत मोंथा चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे आणि ते मछलीपट्टनम-कलिंगपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितले.
हवामान खात्याने सांगितले की, आग्नेय बंगालच्या उपसागरावरील खोल कमी दाबाचा पट्टा 26 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळात तीव्र झाला. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी तो तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. या चक्रीवादळाबाबत सविस्तर जाणून घेऊया..
मोंथा चक्रीवादळ कधी आणि कुठे धडकेल?
हे चक्रीवादळ ओडिशातील मलकानगिरीपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे. ते आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि वाऱ्याचा वेग ताशी 100 किमी पर्यंत पोहोचेल. येणाऱ्या आपत्तीचा परिणाम 15 जिल्ह्यांवर होईल, त्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
याशिवाय, चक्रीवादळ मोंथामुळे 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे:
- रायलसीमा, तामिळनाडू, केरळ : ऑक्टोबर 27-28
- कर्नाटकचा किनारी भाग: 26-28 ऑक्टोबर
- आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि यनम: 26-30 ऑक्टोबर
- तेलंगणा आणि ओडिशा: 27-30 ऑक्टोबर
- छत्तीसगड: 27-30 ऑक्टोबर
या ठिकाणांवर वादळाचा परिणाम होईल
- आंध्र प्रदेश: काकीनाडा, विशाखापट्टणम, मछलीपट्टणम
- ओडिशा: गोपालपूरजवळ
- तामिळनाडू: चेन्नईपासून दूर, पण सावधगिरी बाळगण्याची सूचना
