हैदराबाद- आंध्र प्रदेशच्या NTR जिल्ह्यात एका महिलेच्या हत्येचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांना 18 सप्टेंबर 2026 रोजी इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या हद्दीत VTPS कूलिंग कॅनॉलमधून एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृतदेहाची अवस्था अशी होती की पोलिसांसमोर सर्वात आधी तिची ओळख पटवणे आव्हान बनले. यानंतर बेपत्ता महिलांशी संबधित प्रकरणांची तपासणी करताना पोलीस मृत महिलेच्या कुटूंबापर्यंत पोहोचले. मृत महिलेचे नाव कल्याणी  उर्फ दुर्गा असे असून ती  गुंटूर जिल्ह्याच्या मंगलागिरीची राहणारी होती. शफी असे आरोपीचे नाव आहे.

कल्याणी आपल्या पती आणि कुटुंबापासून विभक्त राहत होती आणि एकटी राहत होती. तपासादरम्यान पोलिसांना कळाले की तिचे विजयवाडाच्या भवानीपुरम भागातील मटण व्रिकेत्या एका व्यक्तीशी कथितरित्या संबंध होते. 

तपासात समोर आले की 17 सप्टेंबरला कल्याणी आणि मटन दुकान चालवणाऱ्या व्यक्तीमध्ये पैशांवरून वाद झाला होता. सांगितले जात आहे की कल्याणी त्याच्याकडे पैसे मागत होती. याच वादानंतर तिची हत्या केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांच्या अनुसार, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून कॅनॉलमध्ये फेकून दिले. 

टॅटूवरून पटली महिलेची ओळख-

पोलिसांनी सांगितले की, इब्राहिमपटनम येथे एक अज्ञात मृतदेह आढळला होता. सोशल मीडियावर माहिती पसरल्यानंतर मृत महिलेचे नाव कल्याणी असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेहाच्या हातावर असलेल्या टॅटूवरून महिलेची ओळख पटवली व त्यानंतर पोलिसांशी संपर्क केला.

पैशांच्या वादातून हत्या -

    हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कल्याणीच्या मोबाईल फोनची कॉल डिटेल तपासणे सुरू केले. तिच्या मोबाईलशी जोडलेल्या कॉल डेटाच्या तपासाच्या आधारावर पोलिसांनी तीन लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस तपासात मटन दुकान चालवणाऱ्या शफीचे नाव समोर आले. पोलिसांच्या मते शफी भवानीपुरमच्या एचपी कॉलनीत राहतो आणि मटनचे दुकान चालवतो. पोलिसांचे म्हणणे आहे की कल्याणी वारंवार शफीकडे पैसे मागायची.

    पोलिसांच्या अनुसार, कल्याणी कथितरीत्या त्याच्याकडे 5 हजार आणि 10 हजार रुपयांसारखी रक्कम मागायची. इतकेच नाही, पोलिसांना हीसुद्धा माहिती मिळाली की तिने शफीला सोने खरेदी करण्यासाठी सुद्धा सांगितले होते. पैशांवरून दोघांमध्ये आधीसुद्धा वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या मते हत्येत वापरलेले हत्यार तेच मटन कापण्याचा सुरा होता, ज्याचा वापर शफी आपल्या दुकानावर करायचा.

    मृत कल्याणी

    तपासात पोलिसांना हेसुद्धा कळाले की शफी एकटा नव्हता. पोलिसांच्या मते त्याला अब्दुल्ला आणि दुर्गा राव यांनी मदत केली होती. दुर्गा राव शफीचा मित्र आहे तसेच तो त्याच्या व्यवसायात सुद्धा मदत करायचा. पोलिसांनी सांगितले की सुरुवातीच्या तपासादरम्यान या प्रकरणात अनेक लोक सामील असल्याच्या अफवासुद्धा समोर आल्या होत्या. तथापि पोलिसांनी वेगवेगळ्या पैलूंची तपासणी केली आणि त्या लोकांच्या भूमिकेला सुद्धा पडताळून पाहिले. पोलिसांच्या मते तपासात त्या लोकांचा या हत्येशी कोणताही संबंध समोर आला नाही.

    कल्याणी आपल्या पती आणि कुटुंबापासून वेगळी राहत होती आणि एकटी राहत होती. पोलिसांच्या अनुसार, भवानीपुरममध्ये राहणाऱ्या मटन व्यावसायिक शफीसोबत तिचे संबंध होते. 17 सप्टेंबरला पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना महिलेचा मृतदेह कॅनॉलमधून मिळाला. पोलिसांच्या तपासात सध्या पैशांवरून झालेला वाद महत्त्वाचा दुवा म्हणून समोर आला आहे.