जेएनएन, मुंबई: पश्चिम रेल्वे (Western Railway) ने 20 डिसेंबर पासून कांदिवली ते बोरिवली विभागात सहाव्या मार्गिकेचे पायाभूत काम (sixth line work) करण्यासाठी 30 दिवसांचा ट्रॅफिक ‘ब्लॉक’ (traffic block) जाहीर केला आहे, जो 18 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. याचाच परिणाम म्हणून 27 डिसेंबर रोजी सुमारे 300 लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. या रद्दीमध्ये अप-डाऊन, जलद आणि धीम्या दुहेरी लोकल सेवांचा समावेश असेल.
रद्दीचे कारण; मेगा ब्लॉक !
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार बोरिवली स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनल कमिशनिंग केले जाणार आहे. 26 डिसेंबर रात्री 11 ते 27 डिसेंबर सकाळी 7 या काळात ‘नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक’ ठेवण्यात आला आहे.
ब्लॉक आणि त्यानंतरच्या वेग मर्यादा (speed restrictions) मुळे, काही लोकल लोकल सेवा गोरेगावपर्यंत मर्यादित असतील किंवा रद्द केल्या जातील. कांदिवली ते बोरिवली सेक्शनमध्ये सहावी लाईन पूर्ण करण्याच्या उद्देशाने चालू आहे आणि त्यामुळे मुंबई लोकल नेटवर्कवर मोठा परिणाम होत आहे.
असा होणार परिणाम?
दरम्यान प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा होणार आहे.दिवसभर सुमारे 1,406 लोकल फेऱ्या येथे चालतात आणि त्यापैकी 20% पेक्षा अधिक रद्द होतील, अशी अंदाजे माहिती आहे. काही लोकल गाड्या गोरेगावपर्यंतच धावतील आणि परत येतील, त्यामुळे मुंबईतील प्रवासी व रोजगार करणाऱ्यांना गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पर्यटक आणि नोकरदार वर्गावर परिणाम!
नववर्षाच्या सणाच्या काळात प्रवासी वाढलेले असतात, त्यामुळे हे रद्दीचे निर्णय प्रवाशांच्या योजनांवर परिणाम करू शकतात.
-रेल्वेकडील उपाय?
पश्चिम रेल्वेने BEST (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय & ट्रान्सपोर्ट) कडे अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्याचा आग्रह केला आहे, जेणेकरून ब्लॉक काळात प्रवाशांना एक पर्यायी वाहतूक साधन मिळू शकेल.
हेही वाचा: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू, ऑपरेशन्सपूर्वी होणार ड्रोन शो
