जेएनएन, मुंबई. Maharashtra Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे चर्चेला आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत.

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडेसर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 28 तासांपासून अद्यापही मतमोजणी सुरु आहे. 

पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे विजयी

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. या विजयाची घोषणा होताच बालेवाडी क्रीडा संकुलातील मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू झाला. समर्थकांनी आणि शिक्षकांनी ढोल-ताशांच्या तालावर नृत्य केले, गुलालाची उधळण केली आणि घोषणा दिल्या.

प्रमुख लढती

    • पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात लढत झाली. कौस्तूभ गावडे हे विजयी झाले. 
    • नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. 
    • पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात सामना आहे. 
    • छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरस आहे. 
    • अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगिता शिंदे आणि दत्तात्रय लहाने हे उमेदवार रिंगणात आहेत.

    बातमी अपडेट होत आहे...