जालना : मालवाहतूक करणारा कंटेनर पुलाचे कठडे तोडून थेट खाली असलेल्या एका धाब्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात कंटेनरमधील चालक आणि क्लीनर अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री अकराच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली येथून हरयाणा पासिंगचा मालवाहतूक करणारा कंटेनर उड्डाणपुलावरून जात होता. कंटेनर भरधाव वेगात असल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
उड्डाणपुलाचे कठडे तोडून कंटेनर थेट खाली असलेल्या एकता धाब्यावर कोसळला. या अपघातात कंटेनरचा चालक आणि क्लीनर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
नेमकं काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील भाग्यनगर परिसरात काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जाणारे हे वाहन अचानक अनियंत्रित झाले. चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर रेलिंग तोडून खाली पुलाच्या बाजूला असलेल्या ढाब्यावर जाऊन कोसळला. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांमध्ये स्वतः कंटेनर चालकाचा आणि ढाब्यावरील किंवा परिसरातील आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.
VIDEO | Maharashtra: Two dead after cargo truck falls 50 feet from flyover in Jalna. (Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/m81pcAOgDP
— Press Trust of India (@PTI_News) November 1, 2026
