जेएनएन, मुंबई. राज्यात मुसळधार पावसाचे धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि पश्मिम महाराष्ट्राला धु-धु धुतले आहे. मात्र, मराठवाड्यात अद्याप मोठ्या पावसांची प्रतिक्षा आहे. असातच आता पाऊस पुढील चार दिवस विश्रांतीवर जाणार आहे. IMD च्या अहवालानुसार, विदर्भात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
5 ऑगस्ट चे हवामान
आज राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित जिल्ह्यात कमी किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.
6 ऑगस्ट चे हवामान
उद्या म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. उर्वरित जिल्ह्यात साधारण किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.
7 ऑगस्ट चे हवामान
शुक्रवारी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात कमी किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.
8 ऑगस्ट चे हवामान
शनिवारी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात साधारण किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.
रविवारी कसे असेल वातावरण
रविवारी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित जिल्ह्यात कमी किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.

