जेएनएन, पुणे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीमध्ये पोटनिवडणूक (Baramati By-Election ) होत आहे. या पोटनिवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar ) या लढत आहेत. त्यांच्याविरोधात राजकीय पक्षांनी उमेदवार दिलेला नाही. मात्र या पोटनिवडणुकीत 21 अपक्ष उमेदवारांही रिंगणात आहेत. आतापर्यंत झालेल्या 19 मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे.
अजित पवारांचा विक्रम मोडला
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मताधिक्याचा विक्रम केला आहे. 165266 मतांचा जादुई आकडा पार केला आहे. त्यांना विसाव्या फेरीपर्यंंत 179,620 मते मिळाली आहेत. बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून देत राष्ट्रीय पातळीवर नोंद केली आहे. तर इतर अपक्षांना 3,830 मते मिळाली आहेत. सुनेत्रा पवार ह्या 175,790 मतांनी आघाडीवर आहेत.
बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा 165265 मताधिक्यानी हरवले होते. आता हा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे. त्यांना अवघ्या वीस फेऱ्यामध्ये 175,790 मतांनी आघाडी घेतली आहे. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जादुई आकडा पार करून विक्रमी मताधिक्य मिळवले आहे.
बारामतीत 58.27 टक्के मतदान
बारामती विधानसभा मतदारसंघात 58.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. बारामतीत 2 लाख 23 हजार 705 जणांनी मतदान केले आहे होते.
