जेएनएन, सोलापूर, Solapur Fire Accident: सोलापुरमधील टॉवेल कारखान्यात अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याच्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अग्नितांडव 8 पैकी 4 जण एकाच कुटुंबातील होते.दुर्घटनेत अवघ्या 1 वर्षाच्या लहान मुलासह 3 महिला आणि 4 पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर-अक्कलकोट रोडवरील MIDC परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला पहाटे भीषण आग लागली होती. कामगारांना वाचवण्यासाठी कारखान्याची भिंत तोडण्यात आली आहे. तर आगीवर तब्बल 13 तासांनी नियंत्रण मिळवले आहे. सद्या आग विझली आहे.

कारखान्याचे मालक हाजी मन्सुरीसह कुटूंबातील सर्वांचा मृत्यू

मृतांमध्ये कारखान्याचे मालक हाजी उस्मान हसनभाई मन्सुरी (80) आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे, म्हणजे त्यांचा नातू अनस हनीफ मसुरी (25), त्यांची पत्नी शिफा अनस मन्सुरी (20) आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा युसूफ मन्सुरी.

उर्वरित चार जण कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते.
त्यांची ओळख पटली ती कामगार मेहताब सय्यद बागवान (45), त्यांची पत्नी आशाबानू (३८), त्यांचा मुलगा सलमान (२०) आणि मुलगी हिना (२६) अशी आहे.
आग लागली तेव्हा सर्व बळी गाढ झोपेत होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधानांंनी केली मदत जाहीर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमधील कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर केले असून जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

    केंद्र आणि राज्य सरकारने केली मदत जाहीर!

    सोलापुरात टॉवेल कंपनीच्या आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना केंद्रानंतर राज्य सरकारनेही मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींनाही सरकार मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मृत्य झालेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.