जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update Today: राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्यापासून मराठवाडा भागात पाऊस सुरु होईल, असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अरबी समुद्रामध्ये चक्रीय वादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम मुंबईवर दिसत आहे. या दरम्यान पावसाशिवाय मेघगर्जना आणि वाढत्या वाऱ्यांचा वेग अनुभवाला येणार आहे.
हेही वाचा - Solapur Fire Incident: सोलापुरातील अग्नितांडवात 8 जणांचा मृत्यू , केंद्र आणि राज्य सरकारने केली मदत जाहीर
कोकण विभागातील मुंबई ,पालघर,ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर,अहिल्यानगर, सांगली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ कायम असणार आहे.
पुढील 3-4 तासांत पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे, बाहेर पडताना काळजी घ्या, असं आवाहन हे मुंबई हवामान विभागानं केलं आहे.