जेएनएन, सातारा. Satara Earthquake: साताऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंप मापन यंत्रावर याची तिव्रता ही 2.8 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.

भूकंपाचे केंद्र 5 किलोमीटर खोल

साताऱ्यात झालेल्या भूकंपाचे केंद्र हे जमीनीपासून खाली 5 किलोमीटर होते. तर त्याचे जमीनीवरील केंद्र हे पुण्यापासून 109 किमी दूर होते. सुदैवाने, या भूकंपाच्या धक्काने अद्याप कोणतेही जीवित वा वित्तिय हानी झाल्याची माहिती नाही. 

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या घटनेची पुष्टी केली आहे आणि त्याला "अत्यंत सौम्य तीव्रतेचा" भूकंप म्हटले आहे, असेही त्यांनी सांगितले.