जेएनएन, सांगली. Sangli News: सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. दुकानातील रेफ्रिजरेटर आणि गॅस सिलेंडरच्या एकापाठोपाठ झालेल्या भीषण स्फोटात, एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.  या दुर्घटनेमुळे संपूर्ण विटा शहरावर शोककळा पसरली आहे.

स्फोट इतका भीषण होता की,

प्राथमिक माहितीनुसार, घरात गॅस गळती होऊन किंवा रेफ्रिजरेटरमधील दूषित गॅसमुळे स्फोट झाला असावा. स्फोट इतका भीषण होता की, कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. आणि घरातील चार जण हे आगीच्या भस्मस्थानी पडले.

विटा शहरातील सावरकर नगर येथील घराच्या तळमजल्यावर असलेल्या भांडी आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानात सकाळी 9 वाजता आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ती कुटुंब राहत असलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पसरली. घरातून बाहेर पडण्यासाठी अरुंद मार्ग होता आणि पीडितांना तेथून पळून जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले.

4 जणांचा मृत्यू, एक जण जखमी

    कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. विष्णू जोशी (50), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (46), मुलगी प्रियंका योगेश इंगळे (30) आणि नात सृष्टी (3) अशी त्यांची ओळख पटली आहे, असे त्यांनी सांगितले.

    कुटुंबातील आणखी एक सदस्य सुरेश जोशी (20) जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    त्यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले.