जेएनएन, पुणे. Pune News: पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुण्यातील इंद्रायणी, मुळा-मुठा, भीमासह अन्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसंच घाटमाथ्यावर होत असलेल्या कोसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आजही हवामान विभागाने पुण्यासाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जोरदार ते खूप जोरदार पाऊस
आज पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश सामन्यात: ढगाळ राहण्याची शक्यता व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे आयएमडीने वर्तवला आहे.
7 जुलै 2026 च्या 08.30 तास ते 8 जुलै 2026 च्या पुणे पाऊस(मिमी)
- मालिन - 156.5
- भोर - 100.0
- चिंचवड - 99.0
- पाषाण - 94.4
- शिवाजीनगर - 84.8
- राजगुरुनगर - 83.5
- शिरूर - 72.5
- डुडुळगाव - 60.0
- दापोडी - 55.0
- हवेली - 35.5
- बारामती - 17.6
- दौंड 17.5

