जेएनएन, पुणे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यातच आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. आज 6 जुलै, सकाळी 7:15 - पुढील 3-4 तासांत उत्तर कोकण आणि पुणे, सातारा, नाशिक व रायगडच्या घाट क्षेत्रांमध्ये मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे; यात काही ठिकाणी पावसाचा जोर अत्यंत तीव्र असू शकतो, अशी माहिती हवामान तज्ञ होसळीकर यांनी दिली आहे.
पुण्यात शहरात यलो तर घाट भागात रेड अलर्ट (Pune Rain Alert)
पुणे जिल्ह्यात घाट भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर शहर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. तर खडकवासला धरणाच्या धरणप्रवणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे
6 Jul, 7.15 am, Possibility of mod to very heavy spells possibility during next 3,4 hrs over North konkan including ghat areas of Pune Satara Nashik & Raigad. Few very intense spells too..
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2026
Stay safe... pic.twitter.com/Yr2l65opez
मुंबईत आज रेड अलर्ट (MumbaI Weather Update)
भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी 3.22 वाजता समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती आहे.
मुंबईत शाळांना सुटी जाहीर
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे
हेही वाचा - Weather Update Today: पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द भागात रविवारी रात्री मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळल्याने किमान सहा जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याला शोधण्यासाठी 'नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स' (NDRF) च्या जवानांसह विविध यंत्रणांचे बचावकार्य सुरू आहे.
