जेएनएन, पुणे. Khadakwasla Dam News: खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक विसर्ग वाढवून 27,203 क्युसेक्स इतका सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुण्यातील इंद्रायणी, मुळा-मुठा, भीमासह अन्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसंच घाटमाथ्यावर होत असलेल्या कोसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आजही हवामान विभागाने पुण्यासाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जोरदार ते खूप जोरदार पाऊस

    आज पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश सामन्यात: ढगाळ राहण्याची शक्यता व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे आयएमडीने वर्तवला आहे. 

    पुण्यातील धरणांतील पाणी

    अ.क्र.धरणटक्केवारीविसर्ग क्युसेक
    1खडकवासला10027203
    2वरसगाव45.360
    3टेमघर26.490
    4पानशेत48.810
    5पवना65.720
    6मुळशी60.270