जेएनएन, पुणे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी एक प्रचंड 'आक्रोश मोर्चा' काढला. आंदोलक विद्यार्थ्यांशी एकता दर्शवण्यासाठी NCP-SP च्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले आहेत. या मोर्चावर आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांची रोहित पवारांवर टीका
‘MPSC आंदोलन की राजकीय नौटंकी? विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर चर्चेतून मार्ग काढण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. पेपरफुटीप्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली असून दोषींवर कठोर कारवाई होणारच! MPSC ही एक स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून स्वतःचे राजकीय करिअर चमकवणाऱ्या या ‘राजकीय नौटंकीला’ आता जशास तसं उत्तर दिलं जाईल! विद्यार्थ्यांचे प्रश्न चर्चेतून सुटतील, राजकीय स्टंटबाजीने नाही..’ असे म्हणतं चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
MPSC आंदोलन की राजकीय नौटंकी?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर चर्चेतून मार्ग काढण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. पेपरफुटीप्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली असून दोषींवर कठोर कारवाई होणारच!
MPSC ही एक स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून स्वतःचे राजकीय करिअर… pic.twitter.com/YFhTKmGyQU
मुलांना आंदोलन करावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील आपल्या मुलांना आज आंदोलन करावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आजचे वातावरण पाहून जंतरमंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनाची आठवण येते. मी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती करते की, त्यांनी एखादा जबाबदार प्रतिनिधी पाठवावा; आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. पण संवाद होणे गरजेचे आहे..."
