जेएनएन, मुंबई. Chhava Controversy: छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांचा तो क्षण काढून टाकण्यात येणार आहे, अशी माहिती ही छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिली आहे.
14 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात छत्रपती महाराज लेझीमवर नाचताना दाखवले आहे, ज्याविरुद्ध अनेक पक्षांनी निषेध केला होता. त्यानंतर आज चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे नेते अमय खोपकर यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांची (Laxman Utekar meets Raj Thackeray) भेट घेतली.
या भेटीनंतर, ते चित्रपटातून हे दृश्य काढून टाकतील आणि रिलीजपूर्वी इतिहासकार आणि संबंधित लोकांना प्रीमियरमध्ये आमंत्रित केले जाईल, अशी माहिती लक्ष्मण खोपकर (Chhava Director Laxman Utekar) यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी मला समजावून सांगितले की जर या चित्रपटामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर आम्ही ते दृश्य काढून टाकू. आम्हाला ते दृश्य काढून टाकण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट्रातील लोक आणि त्यांचा इतिहास चित्रपटापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, असं लक्ष्मण खोपकर यांनी म्हटलं आहे.
छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणे चुकीचे नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहे. संभाजी राजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय, ही आनंदाची बाब, मात्र, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे महाराष्ट्रातील इतिहासकारांकडून माहिती घ्यावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.