एजन्सी, पुणे. Pune Blast News: पुण्यात बुधवारी मध्यरात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरात आग लागल्याने एका व्यक्तीचा आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झाला, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहराच्या बाहेरील वारजे भागात ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
एका व्यक्तीचा आणि त्याच्या मुलाचा मृत्यू
एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागली, या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू आणि काही सामान जळून खाक झाले आहेत. तसंच, आगीत या घरातील एका व्यक्तीचा आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही आग आता विझवण्यात आली आहे, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास घडली घटना
वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळ नगर येथे पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागली होती भीषण आग. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग विझवण्यात आली. या स्फोटामुळे पत्र्याच्या शेडमधील सामानाची राखरांगोळी झाली होती. या स्फोटामुळे बाजूच्या पत्र्याच्या शेडमधील सगळे सामान विखुरले गेले. इतकी या स्फोटाची तीव्रता होती.