पुणे, पीटीआय: Pune Ganpati Immersion Drowning News: जिल्ह्यातील चाकण परिसरात शनिवारी गणपती मूर्ती विसर्जनादरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बिराडवाडी गावात एका व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर वाकी बुद्रुकजवळ बाम नदीत विसर्जनादरम्यान दोघे जण बुडाले. "प्राथमिक माहितीनुसार, हे दोघे विसर्जनासाठी नेमून दिलेल्या घाटाबाहेर नदीच्या एका भागात गेले होते आणि त्यांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले," असे चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सोळुंके यांनी सांगितले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
तर, शेळ पिंपळगाव येथे भीमा नदीत गणपती मूर्ती विसर्जनादरम्यान आणखी एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.