जेएनएन, पुणे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर निर्घृण अत्याचार करून हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांच्या तपासात भीमराव कांबळे हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. (Nasrapur Minor Rape-Murder Case)
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूर गावातील या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. खटला जलदगती न्यायालायात चालवण्याचे आणि दोषारोपपत्र वेळेत दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतही देण्यात निर्देश दिले आहेत. (Bhor Minor Rape Murder Case)

सविस्तर घटनाक्रम
- उन्हाळ्याच्या सुटीसाठी चिमुकली आजीकडे आली होती. दरम्यान शुक्रवारी (दि. 1 मे) नराधमाने तिला आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्याकडे नेले.
- दुपारी 4 वाजेपर्यंत मुलगी घरी परत न आल्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली.
- त्याचवेळी गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले.
- त्यात आरोपी मुलीला घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसत होते.
- त्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून आणून चोप दिला.
- चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली.
- 2 शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरला होता. चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.
- संध्याकाळी 7 वाजता ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरच घेराव घातला. वादानंतर पोलिसांनी मृतदेह हलवला.
- रात्री 8:00 वाजता ग्रामस्थांनी राजगड पोलिस स्टेशनला घेराव घातला.
- रात्री 9:00 वाजता गावकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली.
- रात्री 11 वाजता एसपी गिल दाखल झाले. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको मागे घेतला.
- शनिवार सकाळी 7:00 वाजतापासून नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
- शनिवारी हजारो महिला व नागरिकांनी भैरवनाथ मंदिराजवळ जमून निषेध मोर्चा काढला.
- मोर्चेकऱ्यांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोकोही केला.
- शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले.
- न्यायालयाने आरोपी कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
- आरोपी भीमराव कांबळे याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.
- ग्रामस्थांनी आज मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ तीव्र आंदोलन केले.
- यामुळे परिसरात प्रचंड वाहतुक कोंडी आणि तणाव निर्माण झाला होता.
- अखेर पाच तासांनी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांननी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले आणि महामार्ग मोकळा केला.

- आंदोलनानंतर, "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. तसेच, आंदोलकांना हटवताना कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज करण्यात आला नाही," असे अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.
आरोपीवर यापूर्वीच बलात्काराचे दोन गुन्हे दाखल
आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (Accused Bhimrao Kamble) हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे येथील रहिवासी आहे. साळवडे गावाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावाबाहेर काढले होते. तो नसरापुरात मोलमजुरीसाठी येत होता. आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत. कांबळे याच्या विरोधात 1998 मध्ये विनयभंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि दुसरा गुन्हा 2015 मध्ये त्यांच्या विरोधात दाखल झाला.

