एजन्सी, पुणे. Pune Airport News: बँकॉकहून देशात विदेशी वन्यजीव प्रजातींची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

सोमवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने (Air India Express Flight) शहरात उतरल्यानंतर पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे झहीरब्बास आयनल मंडल आणि भावेश रमेशभाई सोलंकी यांना ताब्यात घेतले.

20 विदेशी प्राणी सापडले

तपासणीनंतर, अधिकाऱ्यांना त्यांच्या सामानातून एकूण 20 विदेशी प्राणी सापडले, ज्यात 14 हिरव्या झाडाचे अजगर होते, त्यापैकी 13 जिवंत आणि एक मृत आढळला, चार पोपट आणि दोन सुमात्रन पट्टेदार ससे होते, असे एका वरिष्ठ सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले. 

"या प्रजाती योग्य कागदपत्रे किंवा आवश्यक परवानग्यांशिवाय देशात आणण्यात आल्या होत्या." त्यांना वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत संरक्षित केले आहे,” असेही त्यांनी सांगितले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

वन्यजीव ज्या देशातून आणले तिकडेच परत पाठवले जाणार

    लोहगावच्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री दोन प्रवाशांकडून खोक्यात लपविलेले साप, ससे आणि पोपट जप्त केले आहेत. विमानतळावर ताब्यात घेतलेले वन्यजीव परदेशी आहेत. वन्यजीव तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ताब्यात घेण्यात आलेले वन्यजीव ज्या देशातून आणले तिकडेच परत पाठवले जाणार आहेत.