एजन्सी, पुणे: पुणे जिल्ह्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी पहाटे एका कंटेनर ट्रकला कारने धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लोणावळा हिल स्टेशनवरून परत येत असताना सकाळी 5.45 वाजता महामार्गालगत देहू रोडजवळ ईदगाह मैदानाजवळ हा अपघात झाला.
दोन विद्यार्थांचा मृत्यू
देहू रोड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कारने मागून एका कंटेनर ट्रकला धडक दिली. हे चौघेही सिम्बायोसिस कॉलेजचे बीबीएचे विद्यार्थी होते आणि ते लोणावळा येथे फिरायला गेले होते. ते पुण्याला परतत असताना हा अपघात झाला, असे त्यांनी सांगितले.
"टक्कर झाल्यामुळे दिव्या राज सिंग राठोड (20) आणि सिद्धांत आनंद शेखर (20) यांचा जागीच मृत्यू झाला, तर हर्ष मिश्रा (21) आणि निहार तांबोळी (20) हे दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
पोलिसांनी ट्रक चालक मनीष कुमार सूरज मणिपाल (39, रा. वडाळा, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे आणि घटनेचा अधिक तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पुण्यात काही दिवसांपूर्वी जुन्नर शहरात स्थानिक राजकारण्याच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा एक अपघात झाला होता. या मिरवणुकीतील डीजे म्युझिक सिस्टीमने भरलेल्या ट्रकने सहभागींवर आदळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले होते.