जेएनएन, मुंबई. Pandharpur Wari 2024: आषाढी वारी आणि वारकरी हा पंढरपुरात भरणारा सर्वात मोठा सोहळा आहे. जवळपास वर्षभर चालणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पायी चालत पंढरपुरात दाखल होत असतात. या सोहळ्यासाठी राज्यातुन संताच्या पालख्या देखील पंढरपुरात दाखल होत असतात. या पालख्यांसोबत अनके भक्त चालत पायी वारी करतात. या वारी दरम्यान काही पारंपरिक सोहळे देखील घेतले जातात. ज्यातील प्रमुख सोहळा म्हणजे रिंगण सोहळा जो या संपूर्ण वारीचे वैशिष्ट्य असते. आज आपण आपल्या आषाढी वारी विशेष लेखातून या रिंगण सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत.
वारकरी आणि वारी यांच्यातील प्रमुख सोहळा म्हणजे रिंगण. रिंगण ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारी मधील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. वारीच्या प्रमुख मार्गातील काही विशिष्ट मुक्कामाच्या ठिकाणी हे रिंगण घेतले जाते. रिंगणसाठी मोकळे माळरान किंवा मोठे मैदान याचे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व सोबत असतात.या पालखीतील रिंगण पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असते. या रिंगण सोहळ्यात असणाऱ्या अश्वाचे महत्व विशेष असते असे म्हटले जाते की, या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी असलेल्या अश्वावर स्वःत ज्ञानेश्वर महाराज विराजमान असतात.
हे रिंगण करत असताना विविध दिंडीमधून वारीला येणारे वारकरी आपापल्या नियोजित जागी वर्तुळात उभे राहत असतात. या वर्तुळाच्या मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो. सहभागी सर्व वारकरी वर्तुळात उभे राहून गजर सुरू करतात. यावेळी विठ्ठल नामाचा गरज करत टाळ, मृदुंग अशी वाद्ये वाजविली जातात हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावत असतो व त्याच्या मागे वारकरी धावतात. हे रिंगण पूर्ण झाल्यानंतर वारकरी झिम्मा, फुगड्या, मनोरे नाचवत रिंगणाच्या आनंद घेत असतात.
या ठिकाणी घेतले जाते रिंगण
वारकरीचा मुख्य सोहळा असणारे हे रिंगण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी,चांदोबाचा लिंब,बाजीराव विहीर,वाखरी (पंढरपूर जवळ), माळशिरस, ठाकुर बुवा समाधी, भंडीशेगाव, संत तुकाराम म्हाराज पालखी, बेलवंडी, इंदापूर,अकलूज, बाजीराव विहीर, वाखरी या गावी पार पडते तर मेंढ्यांचे रिंगण हे संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांचे रिंगण आहे. या सोहळ्यात बकऱ्यांचे रिंगण पिंपळी येथे होते. त्यानंतरसह दुसरे रिंगण हे इंदापूर येथे होते. हे रिंगण पहायला भाविकांची मोठी गर्दी असते.
डिस्क्लेमर-''या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासमोर सादर केली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. याशिवाय, याच्या कोणत्याही वापराची जबाबदारी स्वतः वापरकर्त्यावर राहील.