जेएनएन, कोल्हापूर. महादेवी हत्तीच्या (Mahadevi Elephant) ताब्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका (review petition) दाखल केली जाणार आहे. 

या प्रकरणात आधीच्या न्यायालयीन निर्णयानुसार हत्तीनीचा ताबा दुसऱ्या ठिकाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, नांदणी मठ, वनतारा संस्था आणि राज्य सरकार यांनी एकत्रितपणे हा निर्णय बदलण्यासाठी पावले उचलली आहेत.  

पुनर्विचार याचिकेची तयारी! 

मुंबईत काल उशिरा राज्य सरकारचे वकील, वनतारा आणि नांदणी मठाचे वकील यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्विचार याचिकेचा मसुदा तयार करण्यात आला. यामध्ये हत्तीनी महादेवीला नांदणी मठातच ठेवण्याचे कारण, तिच्या देखभालीसाठी आवश्यक सुविधा, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व यावर भर देण्यात आला आहे. 

याचिकेत मांडले जाणारे मुद्दे! 

  • महादेवी हत्तीनीची नांदणी मठाशी ऐतिहासिक आणि धार्मिक नाळ आहे. 
  • मठात हत्तीनीच्या देखभालीसाठी असलेली योग्य सोय आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देवासाठी उपयोजना सुरू. 
  • स्थलांतरामुळे ताणतणाव आणि आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता.  
  • स्थानिक भाविक आणि परंपरेशी असलेले घट्ट नाते. 

हेही वाचा - Coastal Road Mumbai: कोस्टल रोडवर वेगमर्यादा तोडणाऱ्या 4,000 जणांवर कारवाई; 82 लाखांचा दंड वसूल