जेएनएन, मुंबई: कोस्टल रोडवर (Coastal Road) वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) मोठी कारवाई केली आहे. मागील 7 महिन्यांत 4000 पेक्षा जास्त वाहनचालकांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईतून तब्बल 82 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोस्टल रोडवर सुरक्षित आणि सुगम वाहतूक करण्यासाठी ठरविण्यात आलेली वेगमर्यादा पाळणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वाहनचालक ती मर्यादा मोडत असल्याचे आढळल्याने RTO ने स्पीड कॅमेरे आणि ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) प्रणालीच्या मदतीने उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवून दंड आकारला आहे.
कारवाईची आकडेवारी!
जानेवारी ते जुलै 7 महिन्यात एकूण 4000 पेक्षा जास्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 82 लाखाचा दंड वसुल केला आहे.
RTO ची कारवाई
आरटीओकडून ठरविण्यात आलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवित असल्याने कारवाई केली आहे. कोस्टल रोडवर कारांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा 80 तासी किलो मीटर असून, काही भागांमध्ये ती 60 किमी तासी पर्यंत आहे. या मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती RTO अधिकारीने दिली आहे.
दरम्यान, RTO ने वाहनचालकांना इशारा दिला आहे की, वेगमर्यादा मोडणे केवळ दंडनीय गुन्हा नसून अपघाताचा धोका वाढवणारी कृती आहे. पुढील काळातही अशीच मोहीम सतत राबवली जाणार असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.