जेएनएन. पुणे - पुण्यातील काही जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणात आता राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदे गट नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही सहकारी पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात.

धंगेकर यांनी केलेल्या आरोपानंतर भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. माहितीनुसार, या प्रकरणात परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांची फैरी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सहकारी पक्ष असूनही ठिकठिकाणी नेत्यांमध्ये उघड वाद पाहायला मिळत आहेत.

रवींद्र धंगेकर यांनी या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक  पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत भावनिक संदेश लिहिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर आजवर कधीही कारवाई केलेली नाही.

या वक्तव्यामुळे धंगेकर यांनी थेट शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. तर भाजप नेत्यांच्या भूमिकेबद्दल अप्रत्यक्ष नाराजी दर्शवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचा व्यवहार नेमका कोणत्या प्रकारे झाला, याबाबत प्रशासन आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. धंगेकर यांनी या प्रकरणात मोहोळ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.सामान्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हा आवाज आहे असे भाष्य धन यांनी केले आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक नेते परस्परांवर टीका करत असल्याने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या मतभेदांचा परिणाम उमेदवारी आणि प्रचारावर दिसू शकतो.