जेएनएन, मुंबई. बारामतीतील अपघातात अजित पवार पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला (Ajit Pawar Plane Crash) आहे. बारामतीत विमानाच्या लॅंडिगदरम्यान हा अपघात झाला. यावर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकदा चक्कर मारल्यानंतर…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू म्हणाले, "आम्ही या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि जबाबदारीने करू. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 8:48 च्या सुमारास लँडिंगच्या वेळी घटनास्थळी दृश्यमानता कमी होती. लँडिंगपूर्वी, एटीसीने वैमानिकाला धावपट्टी दिसत आहे का असे विचारले, आणि त्याने ती दिसत नसल्याचे सांगितले. एकदा चक्कर मारल्यानंतर विमान पुन्हा उतरण्यासाठी आले, आणि वैमानिकाला पुन्हा विचारण्यात आले की लँडिंगसाठी धावपट्टी दिसत आहे का. तेव्हा वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याची पुष्टी केली. एटीसीने लँडिंगला परवानगी दिल्यानंतर, अपघात झाल्याचे दिसून आले."
#WATCH | Pune | On Maha Dy CM Ajit Pawar's demise in a plane crash, Union Minister of Civil Aviation, Ram Mohan Naidu Kinjarapu says," We will conduct an investigation in a transparent and accountable manner. Preliminary information indicates that visibility was poor at the site… pic.twitter.com/qPs0k6hQH7
— ANI (@ANI) January 28, 2026
महाराष्ट्रासाठी ही एक कधीही भरून न येणारी हानी
"माझे मन दुःखाने खूप जड झाले आहे. अजित दादा आता आपल्यात नाहीत हे पचवणे कठीण आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या इतर चार व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति मी शोक व्यक्त करतो. सार्वजनिक सेवेतील त्यांच्या अनुभवामुळे अजित दादा आम्हाला खूप मार्गदर्शन करायचे. महाराष्ट्रासाठी ही एक कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्यासारखे नेते मिळणे खूप कठीण आहे."
