जेएनएन, सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) ग्रामपंचायतीने राज्यात आदर्श ठरवत इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
राज्यातील पहिली ग्रामपंचायत
विशेष म्हणजे ही ग्रामसभा पूर्णपणे बायोमेट्रिक पध्दतीने घेण्यात आली आहे. अशा स्वरूपाची ग्रामसभा घेणारी अलकुड (एम) ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
बायोमेट्रिक मशीनद्वारे करण्यात आली नोंद
ग्रामसभेला गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक मशीनद्वारे करण्यात आली. त्यामुळे पारदर्शकता आणि ग्रामसभेतील शिस्तीला नवीन दिशा मिळाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
हेही वाचा - Pune Accident News: पुण्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जखमी
विविध शासकीय योजनांची माहिती
या ग्रामसभेत गावातील अनेक मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य या विषयांवर ग्रामस्थांनी मते मांडली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आहे.