जेएनएन, मुंबई: कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे सर्व परिचित आहे. राजघराण्यातील असून सुद्धा त्यांनी कधी उच्च-नीच, गरीब-श्रीमंत यात भेद केला नाही. त्यांनी सर्वांना एकसमान मानून मदत केली तसेच राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी असे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे त्यांना आजही एक लोकनेता म्हणून ओळखले जाते. शाहू महाराजांच्या या समाजसेवी कार्यामुळेच त्यांची इतिहासात दाखल घेतली गेली. आज राजर्षी शाहू महाराज यांची102 वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. 

राजर्षी शाहू महाराज हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे होय. त्यांनी छत्रपती म्हणून कोल्हापूरमध्ये 1894  मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते 1922 पर्यंत म्हणेजच त्यांच्या मृत्यू पर्यंत कार्यकाळ सांभाळला. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात मागास जातींतील लोकांसाठी काम केले त्यांना शिक्षणाच्या योग्य प्रवाहात आणणे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे त्यांचे राहणीमान सुधारणे यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील परदेशी शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मदत केली. भारतात आणि महाराष्ट्रात अनेक अनेक जुन्या रूढी परंपरा बंद केल्या गेल्या. अनेक समाजउपयोगी कामे करण्यात आली ज्याचा फायदा राज्यातील जनतेला झाला. शाहू महाराजांच्या या कार्यामुळेच त्यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये घेतले जाते. तसेच या राज्याला  "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे ओळखले जाते.

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य 

  • शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते जेणेकरून प्रत्येकाला सामान शिक्षणाचा हक्क मिळावा.
  • स्त्रियांच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला होता. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा देखील काढली होती.  
  • समाजातील जाती-भेद नाहीसा व्हावा म्हणून त्यांनी, 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. 
  • शाहू महाराजांनी 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा देखील केला.
  • शाहू महाराजांनी 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या तसेच जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली.
  • त्यांनी अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली.

Photo Credit: wikipedia