जेएनएन, मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे.
उद्या अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रात 28 ते 30 जानेवारी 2026 या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - Video: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा आणि का झाला? विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम
