जेएनएन, पुणे. Ahmedabad Plane Crash News: गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचा ही दुर्दैवी अंत झाला. इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये राहायला होता.

आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ असं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत.

अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 242 जणांचा मृत्यू झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते. विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता.