जेएनएन, मुंबई. Ahmedabad Flight Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत राज्यातील 6 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत 240 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी झाला आहे. राज्यातील 6 जण हे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते.
या विमानमध्ये राज्यातील तीन क्रू मेम्बर आणि एक पायलट आणि एक कुटुंब होते. यामध्ये दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (गोरेगाव), आशा पवार (सोलापूर), रोशनी सोनघरे (डोबिंवली) आणि मैथिली पाटील (नवी मुंबई),सुमित सभरवाल (पवई), महादेव पवार (सोलापूर) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
दीपक पाठक हे पंधरा वर्षांपासून एअर इंडिया नोकरीला होते. अपर्णा महाडीक चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती. अपर्णा महाडिक गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया सेवेत कार्यरत होती. सुमित सभरवाल अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को-पायलट होता.
सभरवाल याने 88 वर्षाचे वडिलांसोबत टेकऑफ करण्यापूर्वी संवाद साधला होता. महादेव पवार आणि आशा पवार मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील आहेत. या पवार दांपत्याचा ही विमान अपघातात मृत्यू झाला आहे.
डोंबिवलीतील रोशनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. क्लाईव्ह कुंदर पायलट इन कमांड सुमित सभरवाल सह-पायलट होता. विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. कुंदर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले.