जेएनएन, पुणे: पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून, यामध्ये प्रामुख्याने जागावाटप आणि संभाव्य राजकीय समन्वयावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना UBT आणि मनसे यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पुण्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, पक्षांची ताकद, तसेच मतदारांमध्ये असलेला प्रभाव लक्षात घेऊन दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता तपासली जाणार आहे.

माहितीनुसार, पुण्यात कोणत्या प्रभागात कोणता पक्ष सक्षम आहे, मतांचे विभाजन टाळण्यासाठी कोणत्या जागांवर समन्वय साधता येईल, यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रचाराची दिशा, स्थानिक मुद्दे आणि महापालिकेतील सत्तास्थापनाबाबतची रणनीती यावरही बैठकीत विचारमंथन होऊ शकते.

याआधी मुंबईसह काही अन्य महापालिकांबाबतही संभाव्य युतीच्या चर्चा झाले असून, त्याचा पुढचा टप्पा म्हणून पुण्यातील ही बैठक पाहिली जात आहे. मात्र या बैठकीनंतर औपचारिक आघाडी जाहीर होते का, की केवळ समन्वयापुरतीच चर्चा राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतात की एकत्रित रणनीती आखतात, याचा निर्णय या बैठकीतून होणार आहे.याच बैठिकचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: Nagaradhyaksha winner List : राज्यातील सर्व 288 विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी एका क्लिकवर