जेएनएन, नाशिक: नाशिक जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याची तिव्रता 3.5 होती. तर त्याची खोली ही 5 किलो मीटर होती. जमीन हादरल्याने नागरिकांत घबरात परसली होती. ते घराबाहेर पळाले. दरम्यान, अद्याप या या घटनेत कुठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
EQ of M: 3.5, On: 28/07/2026 09:46:22 IST, Lat: 20.427 N, Long: 73.683 E, Depth: 5 Km, Location: Nashik, Maharashtra.
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 28, 2026
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @DrNKalaiselvi @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/t5yF0FECbj
कालही बसला होता सौम्य धक्का
नाशिक जिल्ह्यात कालही सौम्य धक्का जाणवला होता. त्याची तिव्रता ही 2.9 एवढी नोंदवण्यात आली होती. त्याची खोलीही 5 किमी जमीनीखाली होती.
नाशकात चार वेळा भूकंपाचे धक्के
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 3.6 तीव्रतेपर्यंतच्या चार भूकंपांच्या धक्क्यांची नोंद झाली. रविवारी सकाळी 9.55 वाजल्यापासून सुरू होऊन 50 मिनिटांच्या कालावधीत सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून या भागात होत असलेल्या सततच्या भूकंपामुळे नागरिकांत चांगलीच घबराट पसरली आहे.
