जेएनएन, नाशिक: श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार (First Shravan Somvar) आहे. यानिमित्ताने शिवभक्तांनी राज्यातील सर्व शिवालये गजबली आहेत. अनेक मंदिरात लांबच लाब रांगा लागल्या आहेत. मंदिरात मोठ्या प्रमाणे दर्शन घेण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगेत उभे आहेत. तर, दर्शन घेतलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली आहे.

12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र 3 ज्योतिर्लिंग आहेत. तर अनेक मोठी आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहेत. आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. या निमित्ताने आज अनेक जण भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले आहेत. त्यामुळे सर्वत्र शिवालये ही गजबजली आहेत. सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी 

राज्यातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर हे महादेव मंदिर खूप (Trimbakeshwar Jyotirlinga) प्रसिद्ध आहे. श्रावण सोमवार असलेल्याने नागरिकांनी येथे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांना 3 ते 4 तास लागत आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनानेही येथे अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

घृष्णेश्वर, भीमाशंकरला भाविकांची गर्दी

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे (Grishneshwar Jyotirlinga) दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी सकाळी मोठी गर्दी केली होती. येथे गर्दीच्या वेळी स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाल्याचीही घटना घडली. मात्र, स्वयंसेवकांनी मधस्थीकरुन सर्व प्रकार निवाळला. सध्या सर्वांचे उत्तम दर्शन होत आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimasankar Jyotirlinga,) या मंदिरातही मोठ्या संख्येंने भाविकांची रिघ लागली होती. भाविक श्रावणी सोमवार निमित्तानं भगवान शंकराचे दर्शन करत आहेत.

    हेही वाचा - Grishneshwar Jyotirlinga: संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण करणारे घुष्णेश्वर ज्योतिर्लिंग! काय आहे आख्यायिका, वाचा सविस्तर