जेएनएन, जळगाव. महाराष्ट्रातील जळगावमध्ये ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली आणि काही प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसची साखळी ओढली आणि चालत्या गाडीतून खाली उड्या (Pushpak Express Accident) घेतल्या. याचवेळी समोरुन येणाऱ्या रेल्वेनं अनेकांना चिरडले आहे. यात 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात साखळी ओढल्यानंतर रुळांवर उतरलेल्या दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांना ट्रेनने चिरडले, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. ()

20 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

जळगाव जिल्ह्यातील परांडा इथं एका रेल्वेत काही प्रवाशींनी आग लागल्याची अफवा परसवली. त्यामुळे काही रेल्वे प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उड्या घेतल्या. याचवेळी दुसरी एक रेल्वे बाजूच्या रेल्वे रुळावर भरधाव धावत होती. यात त्या रेल्वे खाली येऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार या घटनेत 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा दिला नाही.

बंगळुरु एक्स्प्रेसने अनेकांना उडवलं

ही घटना जळगाव पाचोरा तहसीलमधील पारधाडे गावाजवळ घडली. पुष्पक एक्स्प्रेसने ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या निघाल्या होत्या. त्यामुळे पुष्पक एक्स्प्रेसला (Pushpak Express) आग लागल्याची अफवा पसरवली गेली. त्यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्या, समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने अनेकांना उडवलं.

    सीएसटीकडे जात होती पुष्पक एक्सप्रेस

    आग लागल्याच्या अफवेमुळे सुमारे 30 ते 40 जणांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू एक्सप्रेसने सुमारे सात ते आठ स्थलांतरितांना चिरडले. पुष्पक एक्सप्रेस पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबई सीएसटीकडे जात होती.

    योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं दुःख

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुष्पक रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, तसेच प्रवाशांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.