जेएनएन, पुणे. पुण्यामध्ये कारचा एक विचित्र अपघात (Pune Car Accident) झाला. दुसऱ्या मजल्यावरच्या पार्किंग मधून एक कार खाली कोसळली. दुसऱ्या मजल्यावरती कार पुढे घेण्याऐवजी चुकीने मागे घेतल्यामुळे ती दुसऱ्या मजल्याच्या पार्किंग वरुन खालीच कोसळली. विमाननगरच्या शुभ अपार्टमेंट मधली ही रविवारची घटना आहे.
भिंत फोडून कार खाली कोसळली
अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. या घटनेच सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यात आपल्याला एक कार खाली भिंत फोडून खाली कोसळताना दिसत आहे. या कारमध्ये काही व्यक्तीही असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचा हा सीसीव्हीटी व्हिडिओ आता व्हायरल होत (Pune Car Accident Viral Video) आहे.
गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात चुकून
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षामध्ये गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात असलेला ड्रायवर चुकून गाडी रिवर्स मध्ये टाकण्यात आली. आणि त्यामुळे ही गाडी खाली कोसळली आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणालाही इजा झालेली नाही.
Don't try to drive/park like James Bond.
— Ashok Bijalwan अशोक बिजल्वाण 🇮🇳 (@AshTheWiz) January 21, 2025
Incident at Shubh Gateway Apartment, Viman Nagar in Pune. pic.twitter.com/v9NOmP3csm
कुठलीही जीवितहानी झाली नाही
पुणे शहरातील विमान नगर भागात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्येकार गाडी मागे घेत असताना हा अपघात झाला. गाडी खाली पडल्याने वाहन चालकाला जोरदार झटका बसला आणि तो मागच्या सीटवर फेकला गेला असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे.