जेएनएन, धुळे. Dhule Crime News: धुळे शहरात छुप्या पध्दतीने गुंगीकारक औषधे विक्री करीत तरूणांना नशेची लत लावणार्या एकास चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 88 हजारांच्या गुंगीकारक औषधीच्या 480 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी दिली आहे.
गुंगीच्या औषधीच्या बाटल्या असल्याची माहिती
धुळे शहरातील शब्बीर नगर परिसरात मुगणे मस्जिद समोर एक जण बेकायदेशीररीत्या गुंगीकारक औषधी बाळगुन त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे (Chalisgaon Road Police station Dhule) सहायक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांना मिळाली होती.
अकबर अली कैसर उचलले
या माहितीच्या आधारावर त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह छापा टाकत एकास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव अकबर अली कैसर अली शहा असे सांगितले.
480 बाटल्या जप्त
आरोपीकडे मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणार्या गुंगीकारक औषधाचा साठा मिळुन आला. 88 हजार 520 रूपये किंमतीच्या एकुण 480 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास शरद लेंडे हे करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी यावेळी दिली.